कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:38 PM2019-09-21T19:38:28+5:302019-09-21T19:39:01+5:30

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्या बैठकीत कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.

After the onion price is 5 rupees, senior officer of the center will come to Lasalgavi | कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

Next
ठळक मुद्देनिर्यात शुल्क दरात अक्षय ८५० प्रति टन झाल्यानंतर निर्यात परिस्थितीची माहिती घेतली.

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्या बैठकीत कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारावर दिनांक १८ सप्टेंबर रोजी एका वाहनातील नऊ क्विंटल कांद्याला ५१०० रु पये प्रतिक्विंटल भावने विक्र ी झाला. कांदा भावातील चढ उतारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात एकच खळबळ उडाल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या या अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या भेटीत एका रात्रीतून एवढी तेजी का आली ? यापुढील काळात बाजारभावातील चढ-उतार सध्या परिस्थिती उपलब्ध असलेला शिल्लक कांदा साठा, नवीन कांदा पीक केव्हा येणार कधी येणार आणि ते येईपर्यंत साठा पुरेल का तसेच नाफेड मार्फत खरेदी झालेल्या कांद्यापैकी आतापर्यंत किती कांदा शहरी भागात पाठविण्यात आला व निर्यात शुल्क दरात अक्षय ८५० प्रति टन झाल्यानंतर निर्यात परिस्थितीची माहिती घेतली.
सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे, याबाबतची संपूर्ण माहिती या बैठकीत अभयकुमार संचालक ग्राहक संरक्षण विभाग, पंकज कुमार सहाय्यक संचालक कृषी आण िशेतकरी कल्याण विभाग, आर पी गुप्ता मुख्य सलाहाकर एमआय डीएच, निखिल पठाडे निदेशक नाफेड, शिरीष जमदाडे सहसंचालक फलोत्पादन विभाग पुणे, बहादुर देशमुख विभागीय अधिकारी पणन मंडळ, जि. डी वाघ उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक, बटु पाटील तालुका कृषी अधिकारी या शिष्टमंडळाने बाजार समितीत भेट देऊन वाढत्या दराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार समिती संचालक नंदकुमार डागा, शिवनाथ जाधव, सचिव नरेंद्र वाढवणे व व्यापारी नितीन जैन आदींनी माहीती दिली.
 

Web Title: After the onion price is 5 rupees, senior officer of the center will come to Lasalgavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा