मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:59 AM2018-05-25T00:59:32+5:302018-05-25T00:59:32+5:30

शिक : सिडकोत नागरिकांनी केलेली वाढीव बांधकामे हटविण्यासंबंधी महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी जव्हार येथे पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्वरित आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे.

After the order of the chief minister, the breaks took place | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला ब्रेक

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला ब्रेक

Next
ठळक मुद्देसीमा हिरेंचे निवेदन : मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून परवानगी

नाशिक : सिडकोत नागरिकांनी केलेली वाढीव बांधकामे हटविण्यासंबंधी महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी जव्हार येथे पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले.
यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्वरित आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सिडकोतील वाढीव बांधकांमांना सिडकोतील घरांना बांधकामाची परवानगी देताना सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून परवानगी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्याचा मनस्ताप नागरिकांना भोगावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: After the order of the chief minister, the breaks took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको