पाकमध्ये शिक्षणानंतरच दहशतवाद मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:20 AM2018-08-13T00:20:08+5:302018-08-13T00:20:31+5:30

पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शिका हेमल त्रिवेदी यांनी व्यक्त केला.

After Pakistan's education, terrorism can be found only after education | पाकमध्ये शिक्षणानंतरच दहशतवाद मिटेल

पाकमध्ये शिक्षणानंतरच दहशतवाद मिटेल

Next
ठळक मुद्देहेमल त्रिवेदी : मुलाखतीत प्रतिपादन

नाशिक : पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शिका हेमल त्रिवेदी यांनी व्यक्त केला.
एस. एम. रिसर्च अ‍ॅन्ड एज्युकेशन फाउंडेशन नाशिक, आयाम नाशिक, आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ‍ॅमंग दी बिलिव्हर्स’ या लघुपट आणि प्रकट मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी हेमल त्रिवेदी यांना रेड मॉस्क आणि तेथील सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक यांच्यामधील सुरू असलेल्या द्वंद्व मतभेदाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, पाकमध्ये तेथील नागरिकच एकमेकांचे शत्रू बनत आहेत.
यावेळी कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने फाउंडेशनच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या हस्ते हेमल त्रिवेदी यांना पैठणी, लखोटा संदेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फाउंडेशनचे सचिव शशांक मणेरीकर यांच्या हस्ते कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे नाशिक पोलीस उपायुक्त पाटील, हॉटेल एक्स्प्रेस इनचे जनरल मॅनेजर रविंद्रन नायर, विवेकराज ठाकूर, नीमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, प्रबल रॉय यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयाम नाशिकचे अध्यक्ष भरत केळकर, शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, गीतकार संजय गिते, प्रज्ञा बोराटे उपस्थित होते.

Web Title: After Pakistan's education, terrorism can be found only after education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.