फेरचौकशीअंती कोष्टी टोळी दीड वर्षाकरिता तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:20 PM2020-06-01T20:20:23+5:302020-06-01T20:20:55+5:30
फेरचौकशी पुर्ण करत संंबंधितांना उपायुक्त तांबे यांनी नोटीस बजावून तडीपारीचे आदेश निर्गमित केले. या टोळीला पुढील दीड वर्षे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातून दीडी वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील टोळी तयार करून शरिराविरूध्दचे व संपत्तीविरूध्दचे गुन्हेगारी कृत्य वारंवार करत दहशत पसरवून टोळी तयार करणाऱ्या टोळीप्रमुख राकेश तुकाराम कोष्टी (२६, रा. विजयनगर, सिडको) याच्यासह त्याच्या तीन सराईत गुंडांना फेरचौकशीअंती पुन्हा दीड वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.
शहरातील सिडको, पंचवटी भागात दहशत माजविणाºया कोष्टीसह त्याचे साथीदार जयेश उर्फ जया हिरामण दिवे (२५,रा.सिध्दी टॉवर, इंद्रकुंड, पंचवटी), आकाश विलास जाधव (१९,रा.मखमलाबादनाका), मयुर उर्फ मुन्ना शिवराम कानडे (२३,मेहेरधाम, पंचवटी) यांनी शरीराविरूध्द व संपत्तीविरूध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करत कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण केला होता. यामुळे या कोष्टी टोळीच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी करून चौकशीअंती त्यांना शहर व परिसरातून नोव्हेंबर २०१९ साली दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते; मात्र या गुन्हेगारांनी विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात हद्दपार आदेशाविरूध्द अपील केले होते. दरम्यान, विभागीय आयुक्त यांनी हद्दपार स्थगित करून फेरचौकशीचे आदेश दिले होते. फेरचौकशी पुर्ण करत संंबंधितांना उपायुक्त तांबे यांनी नोटीस बजावून तडीपारीचे आदेश निर्गमित केले. या टोळीला पुढील दीड वर्षे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातून दीडी वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.