सत्तास्थापनेनंतर नाशकात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:06 AM2019-11-29T01:06:45+5:302019-11-29T01:08:09+5:30
नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सर्व सामान्यांच्या मनातील हक्काचे सरकार असे सांगत गुरुवारी (दि.२८) शहरात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवतीर्थावरील शपथविधीच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुतांशी नेते आणि पदाधिकारी मुंबईस गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्यात शिवसेना, राष्टÑवादी आणि कॉँग्रेस यांचे सरकार स्थापनेच्या चर्चांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. शहरात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
या जल्लोषात राष्टÑवादीचे प्रदेश चिटणीस नाना महाले, विष्णुपंत म्हैसधुणे, संजय खैरनार, नाना पवार, अॅड. चिन्मय गाढे, सागर बेदरकर, शैलेश ढगे, सलमा शेख, शकिला शेख, शाहीन शेख, अनिल परदेशी, शंकर मोकळ, शंकर पिंगळे, डॉ. संदीप चव्हाण, सुनील घुगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईत शपथ विधी सोहोळ्याच्या वेळीच पंचवटी कारंजा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर नव्या सरकारचा शपथ घेण्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. राष्टÑवादी कॉँग्रेस भवनासमोर राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करताना शरद पवार, छगन भुजबळ आणि आघाडीच्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.