जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीनंतरही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:55 AM2018-05-16T00:55:52+5:302018-05-16T00:55:52+5:30
नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.
नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.
योजना सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना तयार झाल्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीकडे हस्तांतरित करून दिली. गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने तेथील यंत्रसामग्री व वाळू खराब झाली होती. तसेच अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठासुद्धा होत होता. पाणीपुरवठा योजनेसाठी दर महिन्याला वीजबिल, कर्मचारी पगार, टी.सी.एल. पावडर, देखभाल दुरुस्ती यासाठी अंदाजे सव्वा लाख रु पये खर्च येतो. धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर टी.सी.एल. पावडरचे मिश्रण करतात व त्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. पाणीपुरवठा समितीने पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारे टी.सी.एल. पावडर व आलम यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नियमित वॉश आउट करणे गरजेचे आहे. शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा केला पाहिजे. पाणीपुरवठा समितीने यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने सर्व मशीनरी बसविण्यात आली आहे.
- ए. के. घुगे, शाखा अभियंताजलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित होता. गत महिन्यात वीजबिल भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची अद्याप चाचणी झालेली नाही. पाणी शुद्ध करणारे अनेक विद्युतपंप बंद आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. याबाबत शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्याकडे पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. भोजापूर धरणावरील उद्भव विहीर व शुद्धीकरण केंद्र येथील सर्व वीजपंप सुरळीत करून समितीकडे द्यावे.
- गोपाळ शेळके
सरपंच, नांदूरशिंगोटे