शिक्षेनंतर न्यायालयात आरोपीने भिरकावल्या चपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:24 AM2019-09-25T01:24:22+5:302019-09-25T01:24:47+5:30
एका शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी चाकूने मुख्याध्यापक पत्नीवर पती संशयित मधुकर खंडू मोरे (७५) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना मंगळवारी (दि.२४) संशयित मधुकर मोरे यास न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. याचा राग येऊन मोरे याने चपला काढून थेट न्यायालयात भिरकावल्या.
नाशिक : एका शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी चाकूने मुख्याध्यापक पत्नीवर पती संशयित मधुकर खंडू मोरे (७५) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना मंगळवारी (दि.२४) संशयित मधुकर मोरे यास न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. याचा राग येऊन मोरे याने चपला काढून थेट न्यायालयात भिरकावल्या. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
२०१८ साली मुख्याध्यापक पत्नी ताराराणी मधुकर मोरे यांच्यावर त्यांचा पती संशयित मधुकर मोरे याने चाकूने वार केले होते. पंधरा वर्षे लक्ष दिले नाही तसेच खर्चासाठी वेळोवेळी पैसे दिले नाही, याचा राग मनात धरून मोरे याने ताराराणी यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी नायर प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या. पंधरा वर्षांत चार पत्नींकडून ‘सोडचिठ्ठी’ मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या मोरे यांनी नायर शाळा गाठून ताराराणी यांच्यावर चाकूने वार केले होते.
या प्रकरणी त्यांचा मुलगा अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मोरेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी मधुकर मोरे यास संशयावरून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविला जात आहे. याप्रकरणी संशयित मोरे यास मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान सुनावणीसाठी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे मोरे यांना ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाच्या वतीने सचिन गोरवाडकर यांनी ८ साक्षीदार तपासले. त्याचा राग आल्याने मोरे याने चपला काढून एका पाठोपाठ न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावल्या. या प्रकाराने न्यायालयात खळबळ उडाली. मोरेविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे मोरे यांना ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सचिन गोरवाडकर यांनी ८ साक्षीदार तपासले. त्याचा राग आल्याने मोरे याने चपला काढून एका पाठोपाठ न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावल्या. या प्रकाराने न्यायालयात खळबळ उडाली. मोरेविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला.
नमस्काराच्या बहाण्याने केले कृत्य
न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आरोपी मोरे याने न्यायालयाला नमस्कार करण्याच्या उद्देशाने खाली झुकून पायातल्या चपला काढल्या अन् काही क्षणात एकापाठोपाठ दोन्ही चपला न्यायदान कक्षाच्या दिशेने भिरकावल्या. ही घटना घडताच बंदोबस्तावर असलेल्या पाच ते सहा पोलिसांनी त्यास धरून न्यायालयाबाहेर नेले. या प्रकरणी वरिष्ठ जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोरेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे न्यायदान कक्ष, सरकारी वकील आणि महत्त्वाच्या साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत पैरवी अधिकाऱ्यांसह सर्वांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे न्यायालयात संशयितांना हजर करताना त्यांना पोलिसांनी न्यायदान कक्षाबाहेर पादत्राणे काढण्यास सांगावे. त्यांची योग्यप्रकारे अंगझडती घेत न्यायदान कक्षात घेऊन यावे. याबाबत पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्याशीही चर्चा केली असून यापुढे न्यायदान कक्षाच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- अजय मिसर,
विशेष सरकारी वकील