तीन वर्षांनंतर नाशिककरांनी अनुभवला चाळिशीचा ‘चटका’; तापमानाने गाठला उच्चांक

By अझहर शेख | Published: May 30, 2023 03:57 PM2023-05-30T15:57:38+5:302023-05-30T15:58:01+5:30

शहराचे कमाल तापमान मे महिन्याच्या पहिला आठवड्यात वेगाने वाढत होते.

After three years, In Nashik The temperature reached a high | तीन वर्षांनंतर नाशिककरांनी अनुभवला चाळिशीचा ‘चटका’; तापमानाने गाठला उच्चांक

तीन वर्षांनंतर नाशिककरांनी अनुभवला चाळिशीचा ‘चटका’; तापमानाने गाठला उच्चांक

googlenewsNext

नाशिक : शहरात तीन वर्षांपूर्वी मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे; मात्र यावर्षी पुन्हा २०१९ व २०२० सालचा उच्चांकाचा विक्रम मागे पडला असून ११ मे रोजी ४०.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले. हंगामातील ही सर्वाधिक उच्चांकी नोंद ठरली आहे. १० मे २०२० साली ४०.३ अंश इतकी उच्चांकी नोंद होती. तीन वर्षांनंतर नाशिककरांना यावर्षी उन्हाच्या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या झळांचा चटका सहन करावा लागला.

शहराचे कमाल तापमान मे महिन्याच्या पहिला आठवड्यात वेगाने वाढत होते. यामुळे १० व ११ मे रोजी नाशिककरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. कमाल तापमान थेट चाळिशीच्याही पुढे जाऊन स्थिरावले. यानंतर पुन्हा तापमानात घसरण झाल्याने नाशिककरांना काही दिवस उन्हाच्या झळांपासून अंशत: दिलासा मिळाला; मात्र उकाड्याने रात्री घामाघूम करून सोडले. शेवटच्या आठवड्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना उन्हाचा जबर चटका जाणवू लागला आहे. आता पुन्हा ३८ अंश सेल्सिअसच्यापुढे पारा सरकला आहे. यामुळे प्रखर ऊन अनुभवावयास येत असून किमान तापमानदेखील २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवू लागला आहे.

दुपारी बाजारपेठा ओस अन् रस्त्यांवर शुकशुकाट
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नाशिककरांना जबर चटका बसत आहे. दुपारच्यावेळी नाशिककर शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहे. बाजारपेठाही ओस पडत असून रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर केला जात आहे.

वर्ष : २०२३ (उच्चांकी नोंद)
१७ एप्रिल- ३९.२

१० मे : ४०.२
११ मे ४०.७

१२ मे ३९.७
३० मे ३८.४

१० मे २०१८ : ४१.१

२० मे २०१९: ४०.३
१० मे २०२० : ४०.०

८ मे २०२१ : ३८.९
१० मे २०२२ : ३९.८

Web Title: After three years, In Nashik The temperature reached a high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.