प्रशिक्षणानंतर जलदूतांकडून कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 05:38 PM2019-03-08T17:38:22+5:302019-03-08T17:38:39+5:30

सिन्नर : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी ११४ ग्रामपंचायती आणि प्रत्यक्षात १२९ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

After the training, the work started by the anthrachers | प्रशिक्षणानंतर जलदूतांकडून कामांना प्रारंभ

प्रशिक्षणानंतर जलदूतांकडून कामांना प्रारंभ

Next

सिन्नर : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी ११४ ग्रामपंचायती आणि प्रत्यक्षात १२९ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची फाउंडेशनने निवड केली आहे. यात चांदवड तालुक्यातील १११, तर सिन्नर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीसह २२९ गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
सिन्नर तालुक्यातील ४५ गावांतील २२० जलदूतांनी तीन दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतले आहे. उर्वरित गावांतील महिला व पुरूषांना चांदवड तालुक्यातील कळमदरी गावात प्रशिक्षण दिले जात आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात शोषखड्डे, परसबाग, झाडे लावण्यासाठी खड्डे तयार करणे, मातीपरीक्षण जलमापनयंत्र या कामांना प्राधान्य दिले जात आहे. ८ एप्रिलपर्यंत तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे नियोजन पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: After the training, the work started by the anthrachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी