जनता विद्यालयात अठ्ठविस वर्षानंतर रंगला स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:41 PM2019-11-03T22:41:26+5:302019-11-03T22:42:02+5:30
लोहोणेर : कुणी शिक्षक, कुणी इंजिनिअर, कुणी डॉक्टर, कुणी व्यावसायिक, कोणी बागायतदार, कोणी गृहिणी अशा सर्वांनी एकत्र येत तब्बल २८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला. इतक्या वर्षांनी झालेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळेही आनंदाश्रूनी पाणावले.

लोहोणेर ता.देवळा येथील जनता विद्यालयात नुकताच सन १९९०-९१ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.
यानिमित्ताने पंचेचाळीस विद्यार्थीविद्यार्थीनी एकत्र आले. तत्कालीन सर्व शिक्षकांनाही यानिमित्ताने बोलावून त्यांचा सन्मानित करण्यात आले.
यावेळी बी. बी. जाधव, बी. के. अहिरे, पी. एफ. झाल्टे, तांदळे, सुर्यवंशी, एस. डी. सोनवणे, केले, मुख्याध्यापक आर. एस. भदाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या स्रेहमेळाव्याचे आयोजन संतोष शेवाळे, अशोक बच्छाव, वर्षा देशमुख, सुरेश बच्छाव, सुनिता अहिरे, प्रतिभा चव्हाण, केदार पवार, शहादेव पिंगळे, कमलेश खैरनार, किशोर कोठावदे, भिला जगताप, हेमंत आहिरे आदींनी केले.