दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नाल्यातील बैल अखेर बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:51 AM2018-08-24T01:51:38+5:302018-08-24T01:52:27+5:30
नाशिकरोड : विजय-ममता सिग्नल येथील टाकळी रोडवरील ड्रिम सिटीसमोर रस्ता दुभाजकामधील नाल्यामध्ये पडलेल्या बैलाला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले.
टाकळी रोडवरील ड्रिम सिटीसमोरील नाल्यात पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साह्याने बाहेर काढताना.ं
नाशिकरोड : विजय-ममता सिग्नल येथील टाकळी रोडवरील ड्रिम सिटीसमोर रस्ता दुभाजकामधील नाल्यामध्ये पडलेल्या बैलाला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले.
टाकळीरोडवरील ड्रिम सिटी रहिवासी संकुलासमोर रस्ता दुभाजकामध्ये असलेल्या नाल्यात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बैल पडला. बैलाने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा यश येत नसल्याने नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साह्याने नाल्यात पडलेल्या बैलाला दोरखंड बांधून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढले.