Dasara Melava : नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन शिंदे गट मुंबईकडे रवाना
By संजय पाठक | Published: October 5, 2022 11:14 AM2022-10-05T11:14:58+5:302022-10-05T11:15:15+5:30
दसरा मेळाव्यासाठी नाशिक मधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले.
नाशिक : दसरा मेळाव्यासाठी नाशिक मधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान सुरू केले आहे.
पंचवटीतील या मंदिरात आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य प्रमुख पदधिकाऱ्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. शहरातील विविध भागातून आणि जिल्ह्यातून शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन बस निघणार असून विल्होळी येथील जैन मंदिरापासून ते मुंबईकडे रवाना होतील.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्यात आली असून पाथर्डी फाटा येथून बस कार्यकर्ते रवाना होणार आहेत. या मेळाव्याकरिता शिवसेनेने 25 हजार तर शिंदे गटाने 18 हजार कार्यकर्ते मुंबईला नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.