तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीवर पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:09 PM2020-10-04T18:09:29+5:302020-10-04T18:11:36+5:30

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

After waiting for fifty years, electricity reached Pardhi | तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीवर पोहचली वीज

पारधी वस्तीवर वीजेचे दिवे चमकल्याने येथील आदिवासी नागरिकांच्या चेहºयावर आनंद व्यक्त होत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी नागरिकांची साजरी होतेय पहिलीच दिवाळी

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.
गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ५० ते ६० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.
येथील नागरिकांनी वीजे संदर्भात वेळोवेळी शासन दरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले. निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने मिळत गेली, मात्र तरी येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.
पारधी वस्तीवरील नागरिकांनी व येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी विधानसभा निवडणुकीपासून या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी आमदार माणिक कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून या ठिकाणी वीज पोहचवलीगेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.

...अन आदिवासींची जणू दिवाळीच
गेल्या पन्नास वर्षांपासून पारधी वस्तीवर वीज पोहोचली नसल्याने येथील आदिवासी नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत होती. तसेच विजेवर चालणारी उपकरणे वापरता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे या ठिकाणी वीज पोहचल्याने येथे पहिलीच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

आमच्या परिसरात गेल्या पन्नास वर्षांपूर्वी च वीज पोहचली होती मात्र आमच्या वस्तीवर महावितरण च्या दुर्लक्षामुळे वीज पोहचत नव्हती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आज पर्यंत वीज पोहचत नव्हती. या संदर्भात आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती याची दखल घेत आमच्या वस्तीवर पन्नास वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.
- हिरामण पारधी,

Web Title: After waiting for fifty years, electricity reached Pardhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.