सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 10:58 PM2022-01-20T22:58:26+5:302022-01-20T23:01:41+5:30

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित तहसीलदार सचिन मुळीक यांची सुरगाणा तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.

After waiting for six months, Surganya got tehsildar | सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

सचिन मुळीक, तहसीलदार, सुरगाणा.

Next
ठळक मुद्देनाशिक येथील कैलास पवार यांनी तात्पुरता स्वरूपात कार्यभार सांभाळला

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित तहसीलदार सचिन मुळीक यांची सुरगाणा तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.

मराठे यांची बदली झाल्याने नाशिक येथील कैलास पवार यांनी तात्पुरता स्वरूपात कार्यभार सांभाळला होता. या काळात प्रभारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र मोरे हे काम पहात होते. सुरगाणा तालुका आदिवासी क्षेत्रात असल्याने शासनाच्या अनेक योजना, नागरिकांच्या समस्या, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोरोना काळ असल्याने उद्भवणाऱ्या समस्या आदींमुळे मोरे यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तालुका अतिदुर्गम पेसा भागाचा असल्याने तरुण होतकरू तहसीलदार यांची नियुक्ती झाल्याने शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.

माझी नियुक्ती शासनातर्फे प्रथमच आदिवासी पेसा क्षेत्रात झाली आहे. ही बाब माझ्या दृष्टीने हितावह असणार आहे. आदिवासी क्षेत्रातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. निश्चितच जनतेच्या सहभागातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- सचिन मुळीक, तहसीलदार, सुरगाणा.

 

Web Title: After waiting for six months, Surganya got tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.