बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अिश्वनीचा मृतदेह रशियातून भारतात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 06:12 PM2020-07-25T18:12:23+5:302020-07-25T18:17:31+5:30
सिन्नर: तालुक्यातील दुशिंगवाडी (वावी) येथील अिश्वनी राजेंद्र गोराणे (21) या वैद्यकीय घेणार्या तरु णीचा मृतदेह तब्बल बारा दिवसांनी भारतात आला. मृत्यूनंतर तब्बल बाराव्या दिवशी अतिशय शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील दुशिंगवाडी (वावी) येथील अिश्वनी राजेंद्र गोराणे (21) या वैद्यकीय घेणार्या तरु णीचा मृतदेह तब्बल बारा दिवसांनी भारतात आला. मृत्यूनंतर तब्बल बाराव्या दिवशी अतिशय शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणासाठी तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणार्या अिश्वनीचा मंगळवार दि. 14 जुलै रोजी अपघाती मृत्यू झाला होता. आज दि. 25 मध्यरात्री कार्गो फ्लाईटने तिचा मृतदेह मुंबई विमानतळावर आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गावी आणण्यात आला.
एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियन विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून अिश्वनी शिकत होती. जून मिहन्यात सुट्टीसाठी गावी येणारी अिश्वनी कोरोना संकटामुळे रशियातच अडकली होती. विद्यापीठाच्या आवारात आपल्या मैत्रिणींसह फिरत असताना तिचा पाण्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.
तिच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह भारतात येण्यासाठी आठवडयापेक्षा अधिक काळ नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागली. तब्बल तीन वेळा एअर फ्लाईट पुढे ढकलल्याचे कारण देत मृतदेह येणे लांबणीवर पडले होते. शुक्र वारी दि. 24 रशियाची राजधानी मॉस्को येथून इस्तंबूल मार्गे मुंबईकडे उड्डाण घेतलेल्या विमानाने अिश्वनीचा मृतदेह रवाना करण्यात आला होता. हा मृतदेह त्याच दिवशी रात्री 8 वाजे पर्यंत मुंबई पोहोचणार होता.
मात्र इस्तंबूल मध्ये टेक आॅफ साठी विलंब लागल्याने अखेर आज दि. 25 मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर या विमानाचे आगमन झाले. सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुंबई पोलिसांकडून तांत्रिक तपासण्या झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. दुपारी एक वाजता वावी येथे मृतदेह घेऊन येणारी रु ग्णवाहिका आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्र ोश केला. तब्बल बारा दिवसांनी अिश्वनीचा मृतदेह घरी आल्याने संपूर्ण वातावरण मन हेलावून सोडत होते.
कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आपल्या सहकार्यांसह गोराणे वस्तीवर थांबून होते. केवळ कुटुंबातील सदस्यच अिश्वनीच्या मृतदेहाचे दर्शन घेऊ शकतील असे सांगत पोलिसांनी अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन ग्रामस्थ व इतर नातेवाईकांना केले होते. अंत्यविधी स्थळापासून तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर बाहेरून येणार्या सर्वांनाच रोखण्यात आले. मृतदेह अंगणात ठेवल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात दर्शनविधी पार पडल्यावर मृतदेह अंत्यविधी स्थळी नेण्यात आला.