पुन्हा २८ नवे रूग्ण : शहरात चौघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 09:45 PM2020-06-06T21:45:08+5:302020-06-06T21:47:12+5:30

शुक्रवारी (दि.५) दिवसभरात महापालिका हद्दीतील विविध उपनगरांमध्ये एकूण २० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. यावरून शहरातील कोरोना संक्रमणाचा वेग सहज लक्षात येऊ शकतो.

Again 28 new patients: Four corona patients die in the city | पुन्हा २८ नवे रूग्ण : शहरात चौघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

पुन्हा २८ नवे रूग्ण : शहरात चौघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरात आतापर्यंत १३३ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४५

नाशिक : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शनिवारी (दि.६) शहरात एकूण नवे २८ कोरोनाबाधित आढळून आले तर यापुर्वी उपचारार्थ दाखल असलेल्या चौघा रूग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.५) दिवसभरात महापालिका हद्दीतील विविध उपनगरांमध्ये एकूण २० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. यावरून शहरातील कोरोना संक्रमणाचा वेग सहज लक्षात येऊ शकतो. तसेच शहरात आतापर्यंत १३३ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहे. शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३४५पर्यंत जाऊन पोहचला. यापैकी १९४ रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.
एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. शहरातील एकूणच व्यवहार सुरळीत होत असून शनिवारी शहरातील बाजारपेठा अचानकपणे गजबजून गेलेल्या दिसून आल्या. लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आणि कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारकडून सुचविलेले सर्वच उपाययोजना आणि नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र पहावयास मिळाले, जर अशीच परिस्थिती राहिली तर ही मोठ्या धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
---
...येथे आढळले आज २८ रूग्ण
शनिवारी शहरातील ६० पैकी २८ कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये गंगापूर रोड येथे पुन्हा एक रूग्ण, पंपिंग रोडवर १, पंडित कालनी १, दिंडारी नाका १, सरदार चाक १, माडसांगवी १, सारडा सर्कल १, नाईकवाडी पुरा ३, पेठराड २, पंडित नगर सिडको २, कोणार्कनगर १, वडाळानाका येथील मोठा राजवाडा ३, जुने सिडको १, देवळाली कॅम्प १, नागचौक १, भवानी प्रसाद रो -हाऊस १, टाकळी रोड १, विधाते नगर, अशोका मार्ग १, गुलमोहर नगर, म्हसरूळ १, गंजमाळ १, सिन्नरफाटा १, राजेंद्र कॉम्प्लेक्स, नाशिकरोड १ असे २८ रूग्ण करोनाबाधित आहेत.
---
या भागातील चौघा रूग्णांचा मृत्यू
महापालिका रूग्णालयांत उपचार घेणार्या शहरातील चार कोरोनाबाधितांचा शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला. जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा अजमेरी मशिदीजवळ राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. पखालरोडवरील हॅप्पीहोम कॉलनीजवळ एका ४१वर्षीय पुरूषाचाही मृत्यू झाला. तसेच वडाळाशिवारातील खोडे नगरमधील अक्सा कॉलनी परिसरातील एका ३८वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. गंजमाळ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचाही करोनाने मृत्यू झाल्याची माहिती महापालिका वैद्यकिय विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Again 28 new patients: Four corona patients die in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.