लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची पुन्हा मागणी

By Admin | Published: November 9, 2016 01:05 AM2016-11-09T01:05:53+5:302016-11-09T01:02:05+5:30

नागरिकांचे निवेदन : दत्तनगर येथील रहिवासी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Again the demand for deletion of the scrap market on the linkboard | लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची पुन्हा मागणी

लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची पुन्हा मागणी

googlenewsNext

सिडको : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे, त्याच पद्धतीने भंगार बाजाराचेही अतिक्रमण काढण्यात यावे, अशा आशयाचे पत्र दत्तनगर भागातील नागरिकांनी मनपा उपायुक्तांना दिले.  महापालिकेच्या वतीने आज उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निदेशानुसार रस्त्यांना अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यास अंबड-लिंक रोड येथून सुरुवात केली. दिवसभरात चार ठिकाणच्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण मनपाने काढले. याबाबत दत्तनगर, अंबड, चुंचाळे यांसह परिसरातील भागातील नागरिकांनी मंदिराच्या अतिक्रमणाबाबत सातपूर-अंबड लिंकरोड येथील अनधिकृत भंगार बाजाराचेदेखील अतिक्रमण काढावे याबाबत मनपा उपायुक्त आर. एम. बहिरम, विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन दिले. निवेदनात मनपाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जसे धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढले तसेच बहुचर्चित भंगार बाजाराचे अतिक्रमण काढण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने याआधीच दिलेले असताना मनपा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने यात आम्ही हस्तक्षेप करीत नसून असेच आदेश भंगार बाजार काढण्याबाबत दिले असल्याने मनपाने ते त्वरित हटवावे अन्यथा यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी साहेबराव दातीर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, रामदास दातीर, शांताराम फडोळ, बाजीराव दातीर, राहुल खैरनार, सुनील जाधव, संदीप नाठे, नितीन दातीर, विजय मोरे, रंजन सिंग, संदीप वाटके, अविनाश टिळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Again the demand for deletion of the scrap market on the linkboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.