...पुन्हा आढळले स्त्री जातीचे नवजात शिशू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:31 AM2019-03-11T01:31:27+5:302019-03-11T01:32:00+5:30

एकीकडे स्त्री जन्माच्या स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून, नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र शहरात त्याचदिवशी फाळके स्मारक परिसरात स्त्री जातीचे शिशू आढळून आले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे शिशू आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

... again found a female breed newborn | ...पुन्हा आढळले स्त्री जातीचे नवजात शिशू

...पुन्हा आढळले स्त्री जातीचे नवजात शिशू

Next
ठळक मुद्देसंतापजनक : दोन दिवसांत दुसरी घटना; मैदानात वाऱ्यावर सोडून जन्मदात्री फरार

नाशिक : एकीकडे स्त्री जन्माच्या स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून, नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र शहरात त्याचदिवशी फाळके स्मारक परिसरात स्त्री जातीचे शिशू आढळून आले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे शिशू आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटना लागोपाठ घडल्याने समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदिनीच्या काठावरील मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले.
ज्या जिवाला नऊ महिने आपल्या गर्भात वाढविले त्याला जन्म देऊन असे उघड्यावर टाकून फरार होणाºया निर्दयी जन्मदात्री महिलेविषयी तीव्र संतापाची भावना समाजातून व्यक्त होत आहे. मातृत्वाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या कलियुगात अशा काही घटना सभोवताली घडत आहेत. आपल्या स्वार्थापोटी मनुष्यप्राणी कुठल्या स्तरावर जाऊन माणुसकीला काळिमा फासणारे वर्तन क रू शकतो, याचाच प्रत्यय या घटनेमधून समाजाला वारंवार येत आहे. यावरून समाज अद्यापही परिपक्व झाला नसल्याचे अधोरेखित होते.
नवजात शिशुला जन्मास घालून बेवारस सोडून पळ काढणाºया अज्ञात स्त्रीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे नवजात शिशू मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

Web Title: ... again found a female breed newborn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.