पुनःश्च ‘मिशन झिरो’ ॲक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:07+5:302021-05-15T04:14:07+5:30
या अभियानाद्वारे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत ...
या अभियानाद्वारे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे.
इंदिरा गांधी रुग्णालय यांच्या बरोबरीने मायको दवाखाना फुले नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ येथेही हे अभियान सुरु झाले असून पहिल्याच दिवशी एकूण ४१३ अँटीजेन चाचण्या होऊन १० पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ४०३ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. लवकरच सहा ही विभागातील सर्व लसीकरण केंद्रां जवळ महानगर पालिकेच्यावतीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे.
भारतीय जैन संघटना व इतर स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे डॉक्टर आपल्या दारी, बी जे एस मिशन : ब्लड कलेक्शन, प्लाझ्मा जीवनदायी योजना आदी उपक्रम राबविण्यात आले होते. शुभारंभ प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. विजय देवकर आदी उपस्थित होते. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे रामेश्वर मालानी, विनोद गणेरीवाल, बी जे एस चे ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, किरण धनराय हे परिश्रम घेत आहेत. (वा.प्र)
फोटो- १४ जैन समाज
‘मिशन झिरो व मिशन लसीकरण’ या अभियानाचा शुभारंभप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांचेसह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी.