कांद्याने पुन्हा केला वांदा बळीराजा संकटात : उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:47 PM2018-09-29T17:47:52+5:302018-09-29T17:48:05+5:30
लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे.
लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे. कॅलिफोर्निया समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून येथील मुख्य पीक असलेल्या कांद्याचे दररोज घसरत असलेले दर हे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आपल्याकडे उन्हाळ कांदा हा चाळीमध्ये साठवून ठेवला मात्र शेअर बाजाराप्रमाणे कांद्याचे बाजारही कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
मार्च महिन्यात उन्हाळ कांदा साठवला आज सात महिन्यांनंतरही शेतकरी बाजार समितीत तो साठवलेला कांदा विक्र ीकरिता आणत आहे. आपल्या पोराबाळां सारखा सांभाळलेल्या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा पूर्णपणे चिंतातुर झाला असून यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणति बिघडवण्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी या कांद्याला पंधराशे रु पयांपर्यंत भाव मिळाला होता आज मात्र केवळ पाचशे ते सहाशे रु पये दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला त्याचाच परिणाम म्हणून यांना नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भरमसाठ उत्पादन निघाले आहे मार्च मिहन्यापासून शेतकर्यांनी उन्हाळ कांदा आपल्या जमिनीत बांधलेल्या कांदा चाळीत तो साठवून ठेवला आहे मार्च मिहन्यात ज्यावेळी कांदा साठवणूक सुरू होती त्यावेळी कांद्याला सर्वसाधारण भाव हा 650 रु पये इतका मिळत होता आज सात मिहने कांदा साठवून तो बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे त्यावेळी देखील ६०० ते ७०० याच दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने आपण एवढी मेहनत करून साठवलेल्या कांदा आज मातीमोल भावाने विकला जात असल्याने हाती तर काहीच आले नाही उलट कांदायाचा भाव पाहून डोळ्यातून अश्रू पडण्याची वेळ बळीराजावर आल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे.
मागील वर्षी उन्हाळ कांद्याचे भाव यंदाच्या तुलनेत चांगले होते गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याला उच्चांकी भावाची पातळी गाठून कांदा चार हजार रूपयांपर्यंत गेला होता. यंदाही चांगला कांदा भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक झाली असली तरी आज पर्यंत शेतकर्यांच्या नशिबी कांदा भावाची उच्च पातळी पाहण्याची वेळ मात्र आली नसली तरी अजूनही शेतकºयांना रास्त व चांगल्या भावाची अपेक्षा मात्र लागलेली आहे.