पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत
By संजय पाठक | Published: June 4, 2023 04:02 PM2023-06-04T16:02:02+5:302023-06-04T16:02:51+5:30
थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा
संजय पाठक, नाशिक: उध्दव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतनाशिकमध्ये असतानाच शनिवारी (दि.३) त्यांना शिंदे गटानेआणखी एक झटका दिला. सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच नाशिक सुरगणाच्या नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे ज्या ज्यावेळी नाशिकमध्ये येतात, त्याच दिवशी ठाकरे गटातील पदाधिकारी किंवा आजी माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटात प्रवेश करतात, हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे यापूर्वी खासदार राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी (दि.३) संजय राऊत नाशिकमध्ये हेाते. थुंकीप्रकरणामुळे शिंदे गटाकडून आंदोलन सुरू असतानाच संजय राऊत समर्थक आमने सामने देखील आले होते. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नाव घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याची कृती केली असल्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सुरगाण्याचे सर्व नगरसेवकांनाच शिंदे गटात दाखल करून घेतले आहे.
शनिवारी (दि.३) रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा प्रवेश सेाहळा झाला. यावेळी सुरगाण्याचे नगराध्यक्ष भारत वाघमारे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत यांनी केला प्रवेश
भारत वाघमारे- नगराध्यक्ष, सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता), नगरसेवक- भगवान आहेर, पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई वाघमारे. याशिवाय दिनेश वाघ, विलास गोसावी ,गौरव सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.