करवाढीच्या निषेधार्थ ‘भाजपा’विरोधक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:05 AM2018-02-23T01:05:05+5:302018-02-23T01:05:47+5:30
नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.२२) मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग करत सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर, भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी राष्टÑवादीची
शिवसेनेवरही टीकाराष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाबरोबरच शिवसेनेवरही टीका केली. सभागृहात विरोधाचा देखावा निर्माण करणारी शिवसेना दोन दिवसांपासून कोठे आहे, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचा विरोध हा छुपा असून, राज्याप्रमाणेच महापालिकेतही भाजपासोबत गुपचूप कारभार हाकला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.