न्यायालयीन सुनावणीसाठी जाणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:00 PM2019-11-16T13:00:09+5:302019-11-16T13:00:26+5:30
लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
रवींद्र हरिश्चंद्र आहेर (२५) रा. वाहेगाव ता. निफाड यांचे विरु द्ध लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये सन २०१५ मध्ये शेतातील पाण्याची पाईप लाईन फोडल्यावरून भादवी कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील सुनावणीसाठी रविंद्र आहेर हे काल दि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरून म्हणजे वाहेगाव येथून निफाड न्यायालयात मोटारसायकलने जात होते. त्यावेळी अमोल दिलीप डुंबरे, चेतन दिलीप डुंबरे, संदीप गोरख डुंबरे, सुशांत माधव डुंबरे सर्व राहणार वाहेगाव ता निफाड यांनी दगड, लोखंडी गजाने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद आहेर यांनी केली आहे. आहेर यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस स्टेशनला चौघा संशयितांविरू गुन्हा दाखल करण्यात केला आहे. यातील संदीप गोरख डुंबरे यास तात्काळ अटक करण्यात आली असून त्यास न्यायाधीश काळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास २१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच इतर तिघे फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.