थकबाकीदारांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:39 PM2019-03-13T23:39:56+5:302019-03-14T00:06:25+5:30

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.

Aggrieved action will be taken against the defaulters soon | थकबाकीदारांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई

थकबाकीदारांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई

Next

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.  महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक असून, या सर्वांना मनपाच्या वतीने घरपट्टी तसेच पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी मनपास वरिष्ठांनी घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख ७१ हजार तर पाणीपट्टीचे २० कोटी ७९ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख ७१ हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्या सुमारे ६६ मिळकतधारकांना मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे जप्ती वॉरंटदेखील बजाविण्यात आले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख ७१ हजार उद्दिष्टांपैकी बुधवारपर्यंत (दि.१३) सुमारे २० कोटी ४७ लाख इतकी वसुली झाली असून, अजूनही २५ कोटी ८८ लाख इतकी थकबाकी आहे. तर पाणीपट्टीच्या २० कोटी ७९ लाख उद्दिष्टापैकी ७ कोटी ८० लाख इतकी वसुली झाली आहे. अजूनही पाणीपट्टीची १३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूणच घरपट्टी व पाणीपट्टी मिळून २८ कोटी २७ लाख इतकी वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत अजूनही घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून सुमारे ३८ कोटी ८८ लाख इतकी थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या वतीने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. तसेच सूचनापत्र देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांना मनपाच्या वतीने जप्तीच्या वॉरंट नोटीस बजाविण्यात आल्या असून, यानंतर मुदत देऊनही थकबाकी न भरणाºयांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक वसुली मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाºया मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट बजाविण्यात आले आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  - डॉ. सुनीता कुमावत  विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग

Web Title: Aggrieved action will be taken against the defaulters soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.