आघार जनता विद्यालयाला तीन महिन्यांत पाच मुख्याध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:09+5:302021-09-27T04:15:09+5:30
निकम यांनी म्हटले आहे, वारंवार मुख्याध्यापक बदलल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बीएस्सी, ...
निकम यांनी म्हटले आहे, वारंवार मुख्याध्यापक बदलल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बीएस्सी, बी.एड. शिक्षकाची मागणी संस्थेकडे करून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नवीन शिक्षक नियुक्त केली नाही. गरज नसताना मुख्याध्यापक बदलले जात आहेत. माहिती अधिकारात माहितीची मागणी केली असता घाईघाईत माहिती उपलब्ध करून दिली त्या आधारे शाळेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्याकडे तक्रारअर्ज करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही.
शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शालेय व्यवस्थापन समितीचे ७५ टक्के सदस्य हे पालकांचे आई-वडील पाहिजे; पण या शाळेत शासनाच्या या निर्णयाला बगल देत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य हे पालकांचे आई-वडील नसून संस्थेचे सभासद आहेत. त्यामुळे येथे पोषण आहार पूरक आहारप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कृष्णा निकम, किरण हिरे, वीरेंद्र निकम, दीपक हिरे जितेंद्र निकम, श्रावण हिरे, सोपान हिरे, राजेंद्र ठाकरे, वसंत अहिरे व पालकांनी केली आहे.