बाजार समितीत आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 12:42 AM2020-08-15T00:42:50+5:302020-08-15T00:43:10+5:30
सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचालकांची बैठक बोलविली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना न बोलविल्याने कोणतीही सहमती न होऊ शकल्याने बैठक निष्पळ ठरली. दरम्यान, बोलणी फिस्कटल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाºयांनी जाहीर केले आहे.
पंचवटी : सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचालकांची बैठक बोलविली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना न बोलविल्याने कोणतीही सहमती न होऊ शकल्याने बैठक निष्पळ ठरली. दरम्यान, बोलणी फिस्कटल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाºयांनी जाहीर केले आहे.
बाजार समिती कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सहाव्या वेतन आयोग थकीत महागाई भत्ता लागू करावा म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला तातडीची बैठक बोलविण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार शुक्रवारी बाजार समिती संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजार समिती कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु कृषी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने व कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न घटल्याने सध्या तरी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याने या विषयावर कोणत्याही प्रकारची विशेष चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत सुरू केलेले आंदोलन यापुढे सुरू राहील असे बाजार समिती आंदोलनकर्त्यांनी सांगत एका संचालकाने धमकी देत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.
उत्पन्न वाढल्यानंतर कार्यवाही करणार
कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बाजार समितीने काही दिवसांपूर्वी शिखर बँकेची थकबाकी जमा केली त्यातच काही महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे बाजार समितीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याने कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करता येत नाही. बाजार समितीचे उत्पन्न वाढल्यास कर्मचाºयांना महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्यात येईल, असे बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी सांगितले.