शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:12 AM2018-06-02T01:12:32+5:302018-06-02T01:12:32+5:30

शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.

 The agitation of farmers' movement for the demands of farmers | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  किसान सभेचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  किसान सभेचे आंदोलन

Next

नाशिक : शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.  किसान सभेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमिनी व देवस्थान जमिनीधारक सातत्याने रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे; मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असून, शेतकºयांना कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे कर्ज मिळणे मुश्किल झाले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त झाला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे,  विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे, जगन माळी, किरण डावखर, शिवाजी शिंदे, सूर्यभान शिंदे, संजय बैरागी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title:  The agitation of farmers' movement for the demands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी