जाचक नियमांच्या विरोधात सराफ व्यावसायिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:06+5:302021-08-25T04:19:06+5:30
शासनाच्या नवीन कायद्याला आमचा विरोध नाही; परंतु याची नियमावली किचकट आहे, हे व्यावसायिक बांधवांच्या हिताचे नाही असा व्यापारीवर्गाने आरोप ...
शासनाच्या नवीन कायद्याला आमचा विरोध नाही; परंतु याची नियमावली किचकट आहे, हे व्यावसायिक बांधवांच्या हिताचे नाही असा व्यापारीवर्गाने आरोप केला आहे. केंद्र सरकारने व्यापारी शिष्टमंडळाशी चर्चा न करता एकप्रकारे कायदा लादला आहे. यात काही बदल करीत विविध शिक्के प्रमाणित करावे लागतील. तसेच एचयूआयडी पद्धतीने तपासणी करावी लागेल. यामुळे कागदोपत्री कामकाज वाढणार असल्यामुळे शासनाने चर्चा करून किचकट अटी कमी कराव्यात, अशी मागणी केली आहे. कामकाज, बाजार बंद आंदोलनात सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शरद दुसाने, सचिव सुधाकर घोडगावकर, अशोक कोठारी, मुकेश शहा, बाळू पवार यांच्यासह युवक असोसिएशनचे अध्यक्ष अमित संघवी, अमोल दुसाने, घनश्याम वर्मा, दीपक जैन, भूषण आघारकर व असंख्य सुवर्णकार व्यावसायिक, कारागीर आदी सहभागी झाले होते.
फोटो -
मालेगावी सुवर्णकार व्यावसायिकांनी नवीन कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या बंदमुळे बाजारात पसरलेला शुकशुकाट.
240821\img-20210824-wa0020.jpg
मालेगावी सूवर्णकार व्यावसायिकांनी केद्रांच्या नवीन कायदा विरोधात बंद आंदोलन केल्याने बाजारात झालेली शूकशुकाट.