घोटीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्रशासकीय कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:11 PM2020-08-28T22:11:09+5:302020-08-29T00:05:43+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने घोटी ग्रामपालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प होते.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने घोटी ग्रामपालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प होते.
शासनस्तरावर प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकाºयांना निवेदन दिले. रखडलेल्या व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने शुक्रवारी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले. यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात घोटी ग्रामपालिका कर्मचारीही सहभागी झाल्याने कामकाज ठप्प होते. तालुक्यातून मोठ्या ग्रामपंचायतीसह सर्वच ग्रामपंचायतीतील कर्मचारीवर्गाकडून या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. यावेळी स्थानिक व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. घोटी ग्रामपालिकेतही ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले. गावपातळीवर गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत योगदान देणारा कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाचे, ग्रामपंचायत कर्मचारीवर्गाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने गांभीर्याने या कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे यांनी केली.