नाशिकला आंदोलनाआधीच गोल्फ क्लबवर पाण्याचा मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:21 PM2018-02-14T18:21:38+5:302018-02-14T18:27:07+5:30
व्यायामप्रेमींमध्ये आनंदाचे उधाण
नाशिक- वारंवार तक्रार करुनही गोल्फ क्लब मैदानावरील धुळ, गलिच्छ स्वच्छतागृह, मोकाट जनावरांचा वावर अशा समस्यांचे निराकरण होत नसल्याने आणि धुळीच्या त्रासाने नागरिकांना फार त्रास होत असल्याने ‘पाणी आणा, पाणी मारा’ आंदोलन जॉगर्स क्लब, मोरया क्लब, कौशल्य फाऊंडेशन, जैन सोशल ग्रुप व जेष्ठ नागरीक संघटना यांनी जाहिर केले होते. मात्र महानगरपालिका प्रशासन आंदोलना आधीच खडबडून जागे झाले आणि संपूर्ण ग्राऊंडला दोन दिवसांपासून पाणी मारण्यास सुरवात केली. आंदोलनाचा धसका आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुचनांनमुळे संपूर्ण ग्राऊंडवर उल्हासित वातावरण पहायला मिळत आहे. नागरीकांनी मैदानावर टाकण्यासाठी आणलेले पाणी झाडांना देण्यÞात आले आणि मानपाच्या वतीने चांगले पाऊल उचलले जात असल्याने सर्व आयोजकांनी आंदोलन मागे घेत महिनाभरानंतर संपूर्ण परीस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यÞाचा निर्णय घेण्यात आला. मैदानाच्या बाबतीत तत्परता दाखविल्याने सर्व मनपा कर्मचाºयांचे, अधिकाºयांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी जॉगर्स क्लबचे कृष्णा नागरे, दिपक काळे, मोरया फाऊंडेशनचे मोहन सुतार, भगवान पाटील, कौशल्य फाऊंडेशनचे अॅड. श्रीधर व्यवहारे, दिनेश राख, उपेंद्र वैद्य,गोपाल बिरार, अतुल खाकरीया, मुश्ताक बागवान आदिंसह नागरिक उपस्थित होते.