रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:01 AM2021-02-11T01:01:32+5:302021-02-11T01:01:50+5:30
नाशिक : आदिवासी विकास आयुक्तांनी लेखी दिल्यानंतर राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी संघर्ष संघटनेने आंदोलन स्थगित केले.
नाशिक : आदिवासी विकास आयुक्तांनी लेखी दिल्यानंतर राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी संघर्ष संघटनेने आंदोलन स्थगित केले. पदयात्रेद्वारे या आंदोलकांनी थेट आयुक्तालयावर धडक दिली.
छत्रपती सेनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना निवेदन देण्यात आले असून, रितेश ठाकूर यांनी रोजंदारी शिक्षकांकडून कोट्यवधीची रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात तासिका, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जूनपासून मानधन न मिळाल्यामुळे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलकांच्या पदयात्रेला काही अंतरावरच पोलिसांनी अडविले. अप्पर आयुक्त आणि उपायुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्या मान्य करत, आयुक्तांच्या सहीचे लेखी पत्र दिले. मात्र, या पत्रात स्पष्ट आदेश नसल्याने मोर्चेकऱ्यांनी पत्र स्वीकारण्यास नकार देत आयुक्त कार्यालयावर धडक दिली. चर्चेतून तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात राज्यभरातील कर्मचारी सहभागी झाले होते.