मालेगावी बागूल कॉलनीत पाण्यात बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 11:47 PM2021-09-07T23:47:34+5:302021-09-07T23:50:07+5:30
मालेगाव : शहरातील कलेक्टरपट्टा भागात बागुल कॉलनीमध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी जमले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. यामुळे संतप्त नागरिकांनी जमलेल्या पाण्यात ठाण मांडून आंदोलन केले.

मनपाचे प्रभाग अधिकारी बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कलेक्टरपट्टा भागात ठिकठिकाणी गुडघाभर पाणी जमले असून, तळ घरामध्ये शिरलेले पाणी नागरिकांना विद्युत मोटारी लावून बाहेर काढावे लागत आहे.
संतप्त नागरिकांनी नगरसेवक मदन गायकवाड, विनोद वाघ, राजू शेलार, सुवर्णा शेलार, सरोज पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पाण्यामध्ये बसून आंदोलन केले. मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, सहायक आयुक्त अनिल पारखे, प्रभाग अधिकारी बडगुजर यांच्यासह अग्निशमन विभागाचे संजय पवार यांनी धाव घेऊन परिसरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.