दूध दरवाढीसाठी जिल्ह्यात विविध संघटनांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:41 PM2020-08-01T23:41:19+5:302020-08-02T01:27:17+5:30
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन करण्यात आले़ तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनास निवेदन देणात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन करण्यात आले़ तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनास निवेदन देणात आले़
पिंपळगावी भाजपची निदर्शने
पिंपळगाव बसवंत : दूध दरवाढ तातडीने झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, प्रशांत घोडके, दत्तात्रय काळे, अल्पेश पारख, अशोक मोरे, योगेश लावर, संदीप झुटे, शीतल बुरकुले, दिगंबर लोहिते, दत्तात्रय मोरे, लखन शिंदे, प्रमोद दुसाने उपस्थित होते.
किसान सभेतर्फे दुग्धाभिषेक
दिंडोरी : तालुका किसान सभेतर्फे दिंडोरी येथे दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश चौधरी, आप्पा वाटाणे, उल्हास बोंबले, काशीनाथ वाघले, केशव बहिरम, भारत धोंगडे आदी उपस्थित होते.
घोटी - सिन्नर रस्त्यावर दूध ओतून निषेध
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील घोटी - सिन्नर महामार्गावरील शेणीत गावानजीक भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइंच्या वतीने स्त्यावर दूध ओतून निषेध करण्यात आला. आंदोलनात माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग बºहे, रमेश परदेशी, नंदू गाढवे, भाऊसाहेब कडभाने, तानाजी जाधव, सागर हांडोरे, जगन भगत, महेश गाढव, खंडेराव झनकर, वैशाली आडके, प्रतीक्षा पाठक आदी सहभागी झाले होते.
जव्हार महामार्गावर रास्ता रोको
त्र्यंबकेश्वर : तालुका भाजपतर्फे जव्हार महामार्गावरील वाहतूक अडवून एल्गार आंदोलन करून तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत गायधनी, विष्णू दोबाडे, सुयोग वाडेकर, जयराम भुसारे, सचिन शुक्ल, हर्षल भालेराव, बाळासाहेब अडसरे, प्रविण पाटील, भाऊसाहेब झोंबाड, जनक गोरे, गिरीश पन्हाळे, त्रिवेणी तुंगार, आरती शिंदे, वैष्णवी वाडेकर, स्नेहल भालेराव, सुनीता भुतडा, विजू पुराणिक, संजय कुलकर्णी, रवींद्र गमे, अवधूत धामोडे, योगेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.दूध दरप्रश्नी महायुतीचा महाएल्गार
येवला : दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध करत महायुतीतील भाजप, रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्र ांतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-मनमाड रोडवरील तांदूळवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, रयत क्र ांतीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, माजी उपजिल्हाध्यक्ष प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, वस्रोद्योगचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष कुंदन हजारे, संतोष काटे, बाबू खानापुरे, विनोद बोराडे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.