आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

By admin | Published: March 3, 2017 01:01 AM2017-03-03T01:01:57+5:302017-03-03T01:02:17+5:30

पेठ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.

Agression in tribal school technology | आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

Next

 रामदास शिंदे  पेठ
बदलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.
एकेकाळी त्याच दगडी व कौलारू खोलीत टोपी, सदरा व धोतरच्या वेशातील मास्तर आणि भिंतीवर चिटकविलेल्या मळकट फळ्यावर खडूच्या साह्याने हातात छडी घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे मास्तर आणि फुटकी पाटी पिशवीत कोंबून वावरातून थेट शाळेच्या वर्गात धापा टाकत येणारी मुले; मात्र दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व स्वत:ला सिद्ध करून दाखविण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरू पाहत आहेत.
डिजिटल शाळा ही संकल्पना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तशी दुर्र्मीळच; मात्र शिक्षकांच्या संकल्पनेतून व मोलमजुरी करून कमविलेल्या पैशातून शाळेला दान करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिद्दीने आज ग्रामीण भागातील बालके तंत्रज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. शिक्षकांनी पदरमोड करून शाळांचा चेहरा मोहरा बदलला. एरवी शालेय पोषण आहार व बांधकामाच्या जोखडात सापडलेल्या शिक्षकाने हातात रंग आणि ब्रश घेतला. प्रथम शिक्षकांनी शाळांचा बाह्य भाग सुशोभीत केला. जमेल त्या साधनांचा वापर करून शाळा डिजिटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न तसा अभिनंदनीयच.
आज ग्रामीण भागातील शेकडो शाळांना ई-लर्निंग सिस्टीम मिळाली. संगणकाच्या साह्याने नाहीच काहीतर स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षकांनी सुरू केलेले स्मार्ट ज्ञानदान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी वरदान ठरू पाहत आहे. ग्रामीण शाळांमध्ये तरुण शिक्षकांचा भरणा तसा मोठा आहे. शिकणे व शिकविणे या दोन्हीही गोष्टी शिक्षकांच्या नसानसांत भिनल्याने झपाटल्यागत काम करताना शिक्षक दिसून येत आहेत. स्वत:ची वेबसाइट बनविण्यापासून तर संगणकाचे संपूर्ण ज्ञान, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती ब्लॉगच्या माध्यमातून माहितीचा खजाना शिक्षण विभागासाठी खुला करून देण्यात आला आहे.
आजच्या तंत्रज्ञान युगात सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेतली. यात शिक्षणक्षेत्रानेसुद्धा मोठी मजल गाठली आहे. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संगणक विषय, दृकश्राव्य साहित्याचा अध्यापनातील वापर ते विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत शिक्षणक्षेत्रात नवीन वाटचाल सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातून तंत्रज्ञानस्नेही सर्व शिक्षकवृंदानी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी जिवाची पराकाष्टा केली.

Web Title: Agression in tribal school technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.