शेतीमालाचे लिलाव उद्यापासून बारा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:58+5:302021-05-11T04:15:58+5:30
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री मोठ्या प्रमाणावर होते व त्याची देशात व परदेशात रवानगी होते. मंगळवारी (दि.११) अमावस्या ...
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री मोठ्या प्रमाणावर होते व त्याची देशात व परदेशात रवानगी होते. मंगळवारी (दि.११) अमावस्या असल्याने लासलगाव येथील शेतीमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीनुसार बंद असतील. मात्र, बुधवार, दि. १२ पासून ते २३ मेपर्यंत शेतीमालाचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, परंतु याच आदेशानुसार बाजार समितीला पर्यायी व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी लागेल, असेही नमूद करण्यात आले आहे, तसेच या बाजार समितीचे लिलाव व्यवस्थेवर नाशिकचे जिल्हा उपनिबंधक यांना समन्वयक म्हणून काम करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारही या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत.