शेतीची दुरवस्था, बेरोजगारीमुळे आरक्षणाची मागणी : हनुमंत गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:49 PM2018-08-19T18:49:44+5:302018-08-19T18:53:57+5:30

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. जगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील विविध देशांमधील ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अथवा उद्योग व्यावसायाच्या संधी आहेत. त्या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांचा विकास करण्याची गरज असल्याचे गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Agricultural drought, unemployment demand for reservation: Hanumant Gaikwad | शेतीची दुरवस्था, बेरोजगारीमुळे आरक्षणाची मागणी : हनुमंत गायकवाड

शेतीची दुरवस्था, बेरोजगारीमुळे आरक्षणाची मागणी : हनुमंत गायकवाड

Next
ठळक मुद्देजगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी कौशल्यपूर्ण रोजगाराभिमूख शिक्षण देण्याची गरजबीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांचे प्रतिपादन

नाशिक : उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. जगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील विविध देशांमधील ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अथवा उद्योग व्यावसायाच्या संधी आहेत. त्या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांचा विकास करण्याची गरज असल्याचे गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
मराठा विद्याप्रसारक समाजातर्फे रावसाहेब थोरात सभागृृहात रविवारी (दि.१९) समाज दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस सुनील ढिकले आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शिक्षण संस्थेतून बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांनी स्वत:ला शोधतानाच आपल्यातील गुणवत्ता आणि कौशल्याच्या आधारे उद्योग व्यावसायिकता विकसित करता येईल, असे  शिक्षण मिळणे गरजेचे आहे. अशा शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणााºया अनेक संस्था समाजात कार्यरत आहे. भारतात सुमारे तीन हजार ५०० संस्था गुणवंत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देतात, तर देशाबाहेरील शिक्षणासाठी जवळपास ५०० संस्था शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत करतात. परंतु,अशा सस्थांपर्यंत विद्यार्थी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी) माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची आर्थिक दुरवस्था दूर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच शेतकºयांनी हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन करण्यासोबतच उत्पादन वाढीसाठी पिकांना खते व पाणी कसे द्यावे, किती प्रमाणात द्यावे, यासारखी इत्यंभूत माहिती शेतकºयांना वेळच्या वेळी मिळावी, यासाठी बीव्हीजीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. डॉ. सुनील ढिकले यांनी आभार मानले.

पशुसंवर्धन क्षेत्रातही संशोधन 
भारतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या व्यवसायातही शेतकºयांना चांगला मोबदला मिळावा, म्हणून भाकड जनावरांवर बीव्हीजीने वैज्ञानिक प्रयोग करून लसी शोधून काढत त्यांना दुभते केले. दूध देणारी गाय किंवा म्हैस ५० ते ६० हजार रु पयांस मिळते. मात्र, दुभती जनावरे भाकड झाली की, ती कवडीमोल किमतीत शेतकºयाला विकावी लागतात. ही परिस्थिती येऊ नये, म्हणून बीव्हीजीने पशुसंवर्धन क्षेत्रातही संशोधन केल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Agricultural drought, unemployment demand for reservation: Hanumant Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.