शेतमजूर भागवतात ‘त्या’ प्रवाशांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:24 PM2020-04-30T21:24:11+5:302020-04-30T23:23:58+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरातच जणू बंदिस्त झाले आहेत.
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरातच जणू बंदिस्त झाले आहेत. हातावरची मोलमजुरी करणाऱ्यांचीदेखील मोठी अडचण झाली आहे. मोलमजुरी करणाऱ्यांची वस्ती आडगावजवळ मेडिकल फाट्याला लागून आहे. या वस्तीवरील दोनशे ते अडीचशे कुटुंबे आपल्या ताटातील घास वेगळा ठेवत घराकडे पायी परतणाºया प्रवाशांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने करत आहेत. आडगावजवळील वसंतदादानगरमध्ये अडीचशे कुटुंबे वास्तव्यास आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून येथील रहिवासी कोणी कांदे, कोणी बटाटे तर क ोणी तेल, मीठ-मिरची आणून आपापल्या परीने मदत देतात अन् आपल्या घरातील शिधामधील काही हिस्सा या पायपीट करणाºया गरीब मजुरांसाठी देत मसाला भात, खिचडी शिजविली जाते. या मसाला भाताचे वाटप मूळ गावी पायी निघालेल्या स्थलांतरितांना केले जाते.