मालेगावातील कृषीविज्ञान संकुल राज्याला दिशादर्शक ठरेल - भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:49+5:302021-04-04T04:15:49+5:30

शासकीय विश्रामगृहात कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषीविज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित केली ...

Agricultural Science Complex in Malegaon will be a guide for the state - Bhuse | मालेगावातील कृषीविज्ञान संकुल राज्याला दिशादर्शक ठरेल - भुसे

मालेगावातील कृषीविज्ञान संकुल राज्याला दिशादर्शक ठरेल - भुसे

Next

शासकीय विश्रामगृहात कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषीविज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी भुसे बोलत होते. आ. मौलाना मुफ्ती मोहम्मद, महात्मा फुले कृषी विज्ञापीठ राहुरीचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव मोहन वाघ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. डी. पवार, नियंत्रक विजय कोते, सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके, विभागप्रमुख डॉ.दादाभाऊ यादव, संजय दुसाणे यांच्यासह विविध विभागाचे तज्ज्ञ, कृषी विभागासह कृषीविज्ञान संकुलाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसे म्हणाले, सुमारे २५० हेक्टरमध्ये साकारण्यात येणाऱ्या या पाचही महाविद्यालयांचा आराखडा तयार करताना तो पर्यावरणपूरक राहील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासह अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यावर विचारविनिमय करून सर्वसमावेशक असा आराखडा पुढील पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

Web Title: Agricultural Science Complex in Malegaon will be a guide for the state - Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.