जाखोरीच्या सुनिता कळमकर यांनी जोपासले कृषी तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 08:25 PM2019-02-28T20:25:05+5:302019-02-28T20:27:08+5:30
बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचºयाचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक: जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नाशिक तालुक्यातील जाखोरी या गावात सरपंच सुनीता कळमकर यांनी आधुनिकतेची कास धरत कृषी तंत्रज्ञान जोपासून विविध विकासकामांना गती दिली. याबद्दल त्यांना ‘कृषी तंत्रज्ञान’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
जाखोरी येथे लोकसहभागातून रानमळा नाल्याचे खोलीकर करण्यापासून आदर्श शेतकऱ्यांना कृषी रत्न पुरस्कार देण्यापर्यंत त्यांनी विविध उपक्रम राबविले. तसेच बायोगॅस संयंत्राचा वापरावर भर दिला. चायनीज भाजीपाला विदेशात पोहचविण्याची तजवीज केली. बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कच-याचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळवून दिले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘रोजगार निर्मिती’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.