आठवड्यातून दोनदा कृषी रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:54 AM2020-08-24T00:54:40+5:302020-08-24T00:55:12+5:30
देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.
नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वेनाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात येणार आहे.
आगॅस्ट महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला तीन आठवड्यात शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे उपलब्ध आकडेवाडीवरुन स्पष्ट होत आहे. शेतमालाची वाढती आवक तसेच परराज्यात शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याची मागणी लक्षात घेता कृषिरेल्वे आठवड्यातून एक वेळाऐवजी दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत
होती. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे ही रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, यासाठी पत्र दिले होते. आॅगस्ट महिन्यात तीनवेळा सोडण्यात आलेल्या कृषीरेल्वेत पहिल्या फेरीत (दि.७) रोजी ७३ टन कृषिमाल, (दि.१४) रोजी ९८ टन, (दि.२१) रोजी १५१ टन शेतमाल (भाजीपाला) निर्यात करण्यात आलेला आहे.