उंबरखेड येथे सोयाबीन पिकाबाबत शेती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:54 AM2019-07-26T00:54:42+5:302019-07-26T00:55:21+5:30
निफाड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील उंबरखेड येथे शेती कार्यशाळा झाली.
निफाड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील उंबरखेड येथे शेती कार्यशाळा झाली.
सध्या तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी निफाड तालुक्यात गावोगावी क्रॉपसॅप प्रकल्प संलग्न सोयाबीन, मका, कापूस, ऊस आदी पिकांबाबत शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. याच उपक्र माचा एक भाग म्हणून दि. २५ जुलै रोजी उंबरखेड येथे संतू निरगुडे यांच्या शेतात सोयाबीनच्या शेतात पीक प्रात्याक्षिक दर पंधरवड्यातून एक दिवस सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत कृषी सहायक अशोक जायभाय यांनी उपस्थित शेतकरी यांना सोयाबीन पिकात लावले जाणारे फेरोमोन सापळे, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच पीकविमा योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष सोयाबीन पिकांची शेतकरी गटाच्या माध्यमातून निरीक्षण घेऊन त्यावर चर्चा केली. तसेच मका पिकावरील लष्करी अळीबाबत माहिती देऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती सांगून उपाययोजना करण्याबाबत सांगितले.
यावेळी निफाड पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेश नागपूरकर यांनी मित्र कीटक, शत्रू कीटक, पिकावरील रोग तसेच विविध योजनांची माहिती दिली. यावेळी नारायण पानसरे, विष्णू निरगुडे, संजय पळसे, संतू निरगुडे यांनी सोयाबीनबाबत त्यांचे अनुभव सांगितले.