गोदापात्रातील प्रदूषणामुळे शेतीही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:18+5:302020-12-03T04:24:18+5:30
महापालिकेच्या वतीने काही भागात एसटीपी म्हणजेच मलजल प्रक्रिया केंद्रे असूनदेखील समस्या कायम आहे. प्रक्रिया न करताच मलजल नदीपात्रात सेाडले ...
महापालिकेच्या वतीने काही भागात एसटीपी म्हणजेच मलजल प्रक्रिया केंद्रे असूनदेखील समस्या कायम आहे. प्रक्रिया न करताच मलजल नदीपात्रात सेाडले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. सध्या टाकळी येथील एसटीपीतून नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीपात्रावर फेस येत आहे. त्याचप्रमाणे या फेसामुळे परिसरातील शेतीलादेखील धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार शिवसेनेसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे मध्य नाशिक विभागाचे उपमहानगरप्रमुख सचिन धोंडगे, प्रशांत बडगुजर, अक्षय वाबळे, ज्ञानेश जंत्रे, बबलू गांगुर्डे, पुरुषेात्तम अहिरे, विजय पवार, भूषण पाटील, तन्वर पठाण यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.