शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:28 AM2018-01-18T00:28:58+5:302018-01-18T00:34:22+5:30
नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.
नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.
शेतीची दैनावस्था झाली असल्याची वस्तुस्थिती असून, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शाश्वत शेती होणार नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजे. गावशेतीचे उत्पादन वाढविण्याचा विचार करताना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि किंमत देणारे पीक कसे घेता येईल याचाही विचार झाला पाहिजे,असे ही ते म्हणाले.
गाव समृद्ध करण्यासाठी शेतीचे नियोजन महत्त्वाचे नक्कीच आहे.
शेतकºयाला नैसर्गिक परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. कीड, रोग, निसर्गाची अवकृपा, पूर यातून शेतीचे नुकसान होते. बिबट्याच्या वावर वाढल्याने पिकांकडे दुर्लक्ष झाले, परंतु हे नुकसान शेतकºयालाच सोसावे लागते. शासनाकडून याला संरक्षण मिळत नाही. खरेतर शेतकरी आणि त्याच्या पिकाची जबाबदारी कायद्याने शासनाने घेतली पाहिजे. सरकारी योजनेत शेतकºयाला भागीदार केले पाहिजे, तरच त्याच्या नुकसानीला संरक्षण मिळू शकेल.
शेतकºयाच्या पिकावर देशाची अर्थवाहिनी अवलंबून आहे. बाजारहाट, व्यापार, बॅँका किंबहुना सरकारही शेतकºयावर अवलंबून आहे इतकी शेतकºयाची ताकद आहे. म्हणून शेतकºयांना स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कायद्याने प्रयत्न झाले पाहिजेत. यांत्रिकीकरणाच्या काळात आपल्या चेहºयाला कुठेही महत्त्व नाही, तर बोटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रेरणादायी उपक्रम : दराडेजो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी ही आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. त्याच परंपरेने ‘लोकमत’ने गावातील सरपंचांना सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले त्यांचे कार्य इतर सरपंचांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रत्येक गावाच्या पारावर होणारी चर्चा ही मिनी पार्लमेंटसारखीच असते. येथे होणाºया चर्चेचे प्रतिबिंब गावात, तालुक्यात आणि पुढे देशभरापर्यंत उमटत असते. ज्या गावाचे सरपंच व पोलीसपाटीले क्रियाशील असतील ते गाव आदर्श आणि समृद्ध होण्यास वेळ लागत नाही. गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल, असेही दराडे म्हणाले.