नांदूरशिंगोटे विद्यालयात कृषी दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 03:54 PM2021-07-01T15:54:49+5:302021-07-01T15:55:41+5:30
नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
संस्थेचे माजी विश्वस्त शिवाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप भाबड, सचिव बी. टी. शेळके, संचालक एकनाथ शेळके, सुधाकर शेळके, अरुण शेळके, नागेश शेळके, दत्ता सानप, माजी उपसरपंच संजय शेळके, विकास संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेळके, दीपक बर्के, नानासाहेब शेळके, संचित शेळके, प्राचार्य बी. आर. खैरनार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना वृक्ष वाटप करण्यात आले. प्रास्ताविक एस. सी. सानप, सूत्रसंचालन दिलीप ढाकणे, तर आभार विष्णू सांगळे यांनी मानले.