सिन्नरमध्ये कृषिदिनी शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:34+5:302021-07-02T04:11:34+5:30
या वेळेस तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. वेबिनारचे संयोजन प्रदीप भोर ...
या वेळेस तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. वेबिनारचे संयोजन प्रदीप भोर यांनी केले. यावेळी पंचायत समिती उपसभापती संग्राम कातकाडे यांच्याहस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
स्पर्धेत तालुकास्तरावर गहू पीक उत्पादनात सर्वसाधारण गटातून चोंढी येथील सतीश वाळू पानगव्हाणे यांनी प्रथम क्रमांक पटकवला. पाडळी येथील राजेंद्र रामनाथ वारुंगसे आणि कासारवाडी येथील दिलीप निवृत्ती शेळके यांना अनुक्रमे दि्वतीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच हरभरा उत्पादनात सर्वसाधारण गटातून मुक्ताबाई शिवराम शिरोळे, मौजे धारणगाव यांना प्रथम क्रमांकाचे, तर हरिभाऊ भिकाजी कापसे, पिंपरवाडी आणि राजेंद्र हनुमंतराव राजेभोसले कहांडळवाडी यांना अनुक्रमे दि्वतीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले असून, उपस्थित मान्यवरांच्याहस्ते त्यांचा कृषी दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सहायक गट विकास अधिकारी डी. एस. चित्ते, कृषी अधिकारी कैलास भदाणे, रविकिरण पवार, उल्हास पवार, महेश वेठेकर, विस्तार अधिकारी (कृषी) पी. जी. गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविक कृषी अधिकारी कैलास भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन अण्णासाहेब गागरे यांनी केले, तर आभार रविकिरण पवार यांनी मांडले.
------------------
सिन्नर पंचायत समिती कार्यालयात कृषिदिनी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, डी. एस. चित्ते, कैलास भदाणे, रविकिरण पवार, उल्हास पवार, महेश वेठेकर, प्रदीप भोर आदी.
(०१ सिन्नर कृषी)
010721\01nsk_34_01072021_13.jpg
०१ सिन्नर कृषी