कोणे येथे कृषी दिन साप्ताहला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:25 PM2020-07-01T15:25:28+5:302020-07-01T15:26:32+5:30
वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाने कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहचे सात दिवस आयोजन केले आहे. शेतकऱ्यांयांचा सर्वांगिक विकास व्हावा व त्यांना बदलत्या काळानुसार आपल्या शेतीत बदल व्हावा हा शासनाचा उद्देश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

त्याच पार्श्वभूमीवर कृषीदिन व कृषिदिन साप्ताहची सुरवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे व साप्ते या आदिवासी भागापासून सुरवात करण्यात आली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकºयांच्या बांधावर जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्र्यंबकेश्वरमध्ये भात, नागली, वरई हे प्रमुख पिके असताना येथील शेतकरी हा आता बागायत व आंब्याची शेती, करायला लागला आहे, तसेच येथील शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करून शेती करत असल्याने त्यांनीसमाधान व्यक्त केले.
यावेळी कोणे येथील कृषी सहायक नीलिमा ठुबे यांनी कोणे येथे अतिशय उकृष्ट काम करून शेतकरी महिलांचे कार्यशाळा निर्माण केली आहे, अतिशय उत्तम काम करत असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जि. प. मुख्यकार्यकारी लीना बनसोडे, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना नेते समाधान बोडके पाटील, विनायक माळेकर, सभापती मोतीराम दिवे, रविंद्र भोये आदींसह तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, महसूल व पंचायत समिती अधिकारी उपस्थितीत होते. (फोटो ०१ वेळुंजे)