फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:01 AM2019-05-17T00:01:19+5:302019-05-17T00:02:32+5:30

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे.

Agriculture Department's truce to save orchards | फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभागाची धडपड

फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभागाची धडपड

Next
ठळक मुद्देद्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे. फळबाग वाचवा मोहिमेअंतर्गत गांगवण, दरेभणगी, निवाणे, नवी बेज, भांडणे (हा), शिरसा, कोसवण, सावकी पाळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फळबागांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यंदाचा दुष्काळ फळबागांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. पाण्याचे भीषण संकट, दरदिवशी आटत चाललेले स्रोत यंदा बागा वाचतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कळवण तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास ३०० हेक्टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश आहे.
शिवाय नव्याने झालेली लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय दरदिवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दूरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचविता येतील का यासाठी कृषी विभागाने फळबागा वाचवा अभियान हाती घेतले आहे.
झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायत दारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.सध्याचा दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी कृषी विभागामार्फत अभियान राबविण्यात येत आहे. कृषी सहायकांमार्फत प्रत्येक गावात शेतकºयांचे मेळावे घेऊन प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांनी आच्छादन वापर, मडका सिंचन, बोर्डी पेस्ट वापर आदी उपाययोजनांचा वापर करावा.
- विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, कळवण

Web Title: Agriculture Department's truce to save orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक