कृषी संचालक देशमुख यांनी केली अजित सीडसची पाहणी
By admin | Published: May 19, 2014 10:04 PM2014-05-19T22:04:31+5:302014-05-20T00:07:27+5:30
नाशिक : चितेगाव येथील बियाणे उत्पादक कंपनी अजित सीडस लि., येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक जयवंतराव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तंत्र गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डी. एम. वडकुते, गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक व विभागीय कृषी सहसंचालक भीम कुलकर्णी उपस्थित होते.
नाशिक : चितेगाव येथील बियाणे उत्पादक कंपनी अजित सीडस लि., येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक जयवंतराव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तंत्र गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डी. एम. वडकुते, गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक व विभागीय कृषी सहसंचालक भीम कुलकर्णी उपस्थित होते.
यामध्ये उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व विपणन यंत्रणेची त्यांनी माहिती घेतली. तसेच बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत घेण्यात येणारी दक्षता व कंपनीच्या विविध रेकॉर्डसचे निरीक्षण केले. कंपनीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून, बियाणे क्षेत्रात अधिक सुधारणा व्हाव्यात या विषयी मौलिक सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.
कंपनीच्या फुलंब्री येथील आधुनिक प्रक्रिया केंद्र भेटी दरम्यान, हे भारतातील एक सवार्ेत्कृष्ट प्रक्रिया केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, संचालक रमेश वमवार व प्रक्रिया प्रमुख भैयासाहेब देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
लुलु क्लबच्या फॅक्टरी सेलमध्ये धमाकेदार विक्री
नाशिक : वकीलवाडी येथील हॉटेल पंचवटी येथे लुलु क्लबच्या फॅक्टरी सेलमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून लुलु क्लबच्या बिग शूज कार्निव्हलला यशस्वी केले आहे. लग्नसराईच्या दिवसात लुलु क्लबच्या बिग शूज कार्निव्हलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अजून सुमारे दहा दिवस चालणार्या बिग शूज कार्निव्हलमध्ये ६०० पेक्षा जास्त आकर्षक डिझाइनचे शूज, चप्पल, सॅन्डल, लेदर शूज इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. पुरुष, महिला व लहान मुलांसाठी आकर्षक डिझाइन आणि उत्तम क्वॉलिटीची स्पोर्ट शूज, युवी फॉर्मल शूज, सेमी फॉर्मल, झिपर शूज, कैटी कॅज्युअल, एन्कल, क्रुझ, कॅनव्हास, उरबी, मोकासिनो, ऑक्सफोर्ड, हरापपीज इत्यादी प्रकारचे लेदर शूज उपलब्ध आहेत. कंपनीचे मॅनेजर मिक्की नकवी यांनी सांगितले. लुलु क्लब उच्च दर्जाचे, एक्सपोर्ट क्वॉलिटी शूज बनविते. नाशिकमध्ये पहिल्यांदाच लुलु क्लब बिग शुज कार्निव्हलच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत.