कृषी ग्रामसभेचा पॅटर्न राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:25 AM2017-10-13T00:25:12+5:302017-10-13T00:25:35+5:30

कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्रामसभांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून, कृषी ग्रामसभा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Agriculture Gram Sabhacha Pattern will be implemented in the state | कृषी ग्रामसभेचा पॅटर्न राज्यात राबविणार

कृषी ग्रामसभेचा पॅटर्न राज्यात राबविणार

Next

नाशिक : कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्रामसभांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून, कृषी ग्रामसभा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल,
अशी घोषणा राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
नाशिकच्या उंटवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व कृषी अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत श् ोतकºयांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शेतकºयांना त्यावर उपाययोजना सुचवाव्यात. शेतकºयांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही खोत यांनी यावेळी केली. कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांच्या यादीप्रमाणे विक्री होत असल्याने कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी तसेच या संदर्भात मार्गदर्शन मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष जगदाळे यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित
होते.

Web Title: Agriculture Gram Sabhacha Pattern will be implemented in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.