कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी कृती समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:28 AM2021-03-27T01:28:43+5:302021-03-27T01:29:04+5:30
नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले.
नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांना केला आहे. दिल्लीत लोकशाही पध्दतीने सुरु असलेले शेतकरी आंदोलनांची दखल घेऊन केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने लादलेले काळे कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा व त्यांच्या उन्नतीसाठी पाठबळ द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीतर्फे देण्यात आला, यावेळी शशिकांत उन्हवणे, बाळासाहेब डांगरे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, विलास गुंजाळ, नवनाथ माने, रवी पगारे, योगेश लोखंडे, भूषण पाटील, विशाल गायधनी, शरद सोनवणे आदी उपस्थित होते.